त्यांनी कोकणीमध्ये लिहिलेल्या ‘भुरग्यारवातीर’ (मुलांसाठी) या चरित्रमालिकेत ‘आर्यभट्ट’ (१९८०) व ‘भास्कराचार्य’ (१९८२) यांचा समावेश आहे. तसेच, विज्ञानमालिकेत ‘विश्वाची उत्पत्ती’ (२००४) हे पुस्तक आहे.
त्यांना आजवर मिळालेल्या मानसन्मानांत ‘रिंग ऑफ सॅटर्न’ (१९८०) व ‘रुद्रमुख’ / ‘ओ जॉनी’ (१९८६) यांना गोव्याच्या कला अकादमीने दिलेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच ‘आदित्य’ व ‘जोनास आर्क’ या कादंबर्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गोमंतक मराठी अकादमीचा प्रतिष्ठेचा ‘कृष्णदास शामा पुरस्कार’ त्यांच्या ‘आदित्य’ (१९९२) या कादंबरीला मिळालेला आहे. गोव्यातील नियतकालिकांतून त्यांनी अनेक वैज्ञानिक संकल्पनांवर लेखन केले आहे.
– डॉ. प्रल्हाद वडेर